व्यवस्थापकीय संचालक (एम्.डी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.इ.ओ)

भारतीय उद्योग विश्वातील एक अत्यंत परिचित नाव, एन्.पी.सिंग. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियामधील (एस्.पी.एन्) १९९९ मधील मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) ह्या पदापासून २०१४ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या पदापर्यंत त्यांची भरारी हीच त्यांची सर्वश्रुत ओळख आहे.

‘एस्.पी.एन्’ मधल्या आपल्या प्रदीर्घ प्रवासात मुख्य प्रचालन अधिकारी (सीओओ) म्हणून काम पाहिलेले सिंग आजवरच्या त्यांच्या कॉर्पोरेट जगतातील ३७ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर आज आपल्या पदावरून सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाकरिता नेतृत्व बांधणीवर लक्ष केंद्रित करीत आहेत.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे सखोल आकलन आणि विचक्षण दृष्टी हे एन्.पी.सिंग ह्यांचे वैशिष्ट्य. टेलीव्हिजन आणि डिजिटल प्रेक्षक ह्यांची कक्षा जागतिक स्तरावर रुंदावण्याकरिता कार्यक्रमांमध्ये वैविध्य आणण्यासाठी ‘एस्.पी.एन्’ची भूमिका कशी असावी, ह्यावर त्यांचा गाढा अभ्यास असून त्यांच्याच नेतृत्वाखाली नागरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांची आवडनिवड जोखण्यात एस्.पी.एन् यशस्वी झाली आहे.

सोनी पिक्चर्स नेटवर्क्स
सोनी पिक्चर्स नेटवर्क्स

१९९९ साली ‘एस्.पी.एन्’मध्ये कार्यभार स्वीकारण्यापूर्वी एन्.पी.सिंग ह्यांनी ‘मोदी झेरॉक्स’ आणि ‘स्पाइस टेलीकॉम’ ह्या कंपन्यामध्ये अर्थव्यवहार आणि प्रचालन विभागांत नेतृत्व पदांवर काम केले आहे. सध्या ते सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.इ.ओ) असतानाच ‘बांगला एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ ह्या संस्थेच्या संचालक मंडळावर आहेत. ‘इंडिअन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन’ ह्या संस्थेत ते उपाध्यक्ष आणि संचालक आहेत आणि ‘द ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सील’ (बी.ए.आर.सी) ह्या संस्थेचे सदस्यही आहेत.

 

 

एन्.पी.सिंग हे दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी असून त्यांनी तेथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते दिल्ली विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे स्नातक आहेत.  ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंटस ऑफ इंडिया’ येथून त्यांनी उच्च श्रेणी प्राप्त केली असून त्यांच्या गुणवत्तापूर्ण कर्तृत्वाबद्दल त्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन संस्थेने गौरविलेदेखील आहे.

Related posts

Leave a Comment